नाशिक : जिवे मारण्याचा धाक दाखवून साडेचौदा तोळ्यांचे दागिने जबरीने चोरले
नाशिक : जिवे मारण्याचा धाक दाखवून साडेचौदा तोळ्यांचे दागिने जबरीने चोरले
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कारमध्ये बसलेल्या इसमाला जिवे मारण्याचा धाक दाखवून त्याच्याकडील साडेचौदा तोळ्यांचे दागिने बळजबरीने चोरून नेणार्‍या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मकरंद वासुदेव साळी (रा. सावरकरनगर, सातपूर) हे टेलरिंगचे काम करतात. दि. 23 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुकानातील काम आटोपून घरी जाण्यासाठी सातपूर बस स्टॅण्डसमोरील कानिफनाथ मंदिर येथे लावलेल्या एमएच 15 केके 9722 या क्रमांकाच्या कारमध्ये बसले. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीमध्ये बळजबरीने प्रवेश केला. मागील सीटवर फिर्यादीच्या मागील बाजूस बसलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीचे डोळे झाकले. 

त्यानंतर त्याच्या बाजूस बसलेल्या इसमाने काही तरी हत्यार फिर्यादीच्या गळ्याला लावून जिवे ठार मारण्याचा धाक दाखविला. त्यावेळी अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यात असलेली 2 लाख 20 हजार 66 रुपये किमतीची 70 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 75 ग्रॅम वजनाची 2 लाख 35 हजार 785 रुपये किमतीची पेंडल असलेली सोन्याची चेन असे एकूण 4 लाख 55 हजार 851 रुपये किमतीच्या दागिन्याची बळजबरीने चोरी करून मोटारसायकलीवर बसून आयटीआय सिग्नलच्या दिशेने पळून गेले. 

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group