नाशिक : कुरिअर बॉयने केली चार लाखांची फसवणूक
नाशिक : कुरिअर बॉयने केली चार लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कुरिअरमधील वस्तू वाटप करून आलेली रोख व ऑनलाईन स्वरूपातील चार लाख रुपये जमा न करता कुरिअर बॉयने कुरिअर कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ब्ल्यू डार्ट कुरिअर कंपनीचे मॅनेजर महेंद्र शिवाजी जेजुरे (रा. शिवकृपानगर, हिरावाडी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की दि. 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान आरोपी उमेश भरत पाटील (रा. पंचक, जेलरोड, नाशिकरोड) याला ग्राहकांसाठी आलेले 73 कुरिअर वाटपासाठी देण्यात आले होते. पाटील याने हे 73 कुरिअरमधील वस्तू संबंधित ग्राहकांना वाटप केल्या आहेत. कुरिअर बॉय रमेश पाटील याला ग्राहकांनी कुरिअरचे पैसे रोखीने, तसेच ऑनलाईन स्वरूपात दिले होते; मात्र पाटील याने 3 लाख 89 हजार 486 रुपये फिर्यादी जेजुरे, तसेच कुरिअर कंपनीचे कॅशिअर किरण अनिल सिंग यांच्याकडे जमा न करता ही रक्कम स्वत:कडे ठेवून कंपनीची फसवणूक केली.

 या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group