नाशिक-पुणे एसटी बसचा अशोका मार्गावर भीषण अपघात
नाशिक-पुणे एसटी बसचा अशोका मार्गावर भीषण अपघात
img
Nandini khandare More

सध्या नाशिक शहरातील रस्त्यांचे कामे आणि होणारी वाहतूक कोंडी यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरात अनेक अपघात होत आहेत. दरम्यान आता  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा रविवारी मोठा अपघात झाला. 

नाशिकहून पुण्याकडे जाणारी एमएच 14 बीटी 4426 क्रमांकाची विनाथांबा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस रविवारी दुपारच्या सुमारास अशोक मार्ग परिसरात रस्त्यालगत असलेल्या वृक्षाला धडकली. या अपघातात बसचे चालक, वाहक तसेच प्रवासी जखमी झाल्याची परिसरात
चर्चा होती.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, द्वारका सर्कलकडील अवजड वाहतूक रहिवासी भागातून वळविण्यात आल्यापासून या परिसरात वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत  आहे.संबंधित प्रशासनाने तातडीने वाहतूक व्यवस्थेचा पुनर्विचार करून सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group