नाशिक : सहदेवनगरला धाडसी घरफोडीत सात तोळ्यांच्या दागिन्यांसह रोकड लंपास
नाशिक : सहदेवनगरला धाडसी घरफोडीत सात तोळ्यांच्या दागिन्यांसह रोकड लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरातील सदस्य देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून सात तोळ्यांच्या सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार सहदेवनगर येथे घडला.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अमोल हिरालाल क्षीरसागर (रा. श्री हाईट्स अपार्टमेंट, सहदेवनगर, गंगापूर रोड) हे दि. 10 ते 14 एप्रिलदरम्यान कुटुंबासोबत पुणे, जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे सेफ्टी डोअर तोडून मुख्य दरवाजाचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. 

घरातील तीन बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट उघडून त्यातील दहा हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 75 हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, 30 हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 35 हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे, 75 हजार रुपये किमतीच्या अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, दहा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅमचे कानातील झुमके, 75 हजार रुपये किमतीची अडीच तोळ्यांची सोन्याची पोत, 12 हजार रुपये किमतीचा 70 ग्रॅम वजनाचा सोन्याचा जोड, पाच हजार रुपये किमतीच्या शंभर ग्रॅम वजनाच्या चांदीच्या साखळ्या, सात हजार रुपये किमतीच्या दीडशे ग्रॅम वजनाच्या छोट्या साखळ्या, चार हजार रुपये किमतीचे 90 ग्रॅमचे कानातील जोड, सात हजार रुपये किमतीची दीडशे ग्रॅम वजनाची चांदीची चेन, तसेच दहा हजार रुपये रोख व 16 हजार रुपये किमतीचे यूएस डॉलर असा एकूण 3 लाख 78 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. 

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group