नाशिकच्या TCS कर्मचाऱ्यांना बुरखा घालण्याचे प्रशिक्षण देणारी निदा खान कुठे गायब झाली?
नाशिकच्या TCS कर्मचाऱ्यांना बुरखा घालण्याचे प्रशिक्षण देणारी निदा खान कुठे गायब झाली?
img
दैनिक भ्रमर

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्रकरण सध्या नाशिक मध्ये चर्चेत आहे. नाशिक शहर हे लैंगिक छळ आणि धर्मांतर या प्रकरणाने हादरला आहे.

नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएसची कर्मचारी आणि एचआर निदा खान कुठं लपून बसलीये असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून ती फरार आहे. पण तिचे लोकेशन सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज TCS च्या कार्यालयात जबरदस्ती धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणाने देश हादरला आहे. कॉर्पोरेट जगतातील षडयंत्र समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही पहिल्या दिवशीच फरार झाली. ती अजून यंत्रणांच्या हाती लागलेली नाही. पण तिचे लोकेशन सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

तपास यंत्रणांच्या मते ती सध्या मुंबईतील भिवंडीत लपलेली आहे. तर अटकेपासून वाचण्यासाठी ती गरोदरपणाचा आव आणत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तिने अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. जोपर्यंत तिची वैद्यकीय चौकशी होत नाही तोपर्यंत ती गरोदर असल्याबाबात ठामपणे सांगता येत नाही.

कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचे धर्मांतरण करण्यासाठी निदा खान हिने त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांचा छळ केला. ती मुलींना बुर्का कसा घालायचा याचे जबरदस्तीने प्रशिक्षण देत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. तर इतर कर्मचाऱ्यांनी यातील काही महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. निदा खान हि दिल्ली स्फोटातील आरोपींशी लिंक असल्याचेही या तपासात समोर येत आहे.

धर्मांतरासाठी दबाव

कर्मचाऱ्यांवर नमाज पडण्यासाठी आणि सक्तीने मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्हॅट्सऍप ग्रुपमध्ये निदा सक्रिय होती. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 9 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या मध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तर, रझा मेमन, शारुख कुशेरी, शाफी शेख, आसिफ आफताब, अन्सार आणि शारुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

निदा खान द्यायची ऑफिसमध्ये बुरखा घालण्याचे प्रशिक्षण

टीसीएस प्रकरणात दिवसाआड नवनवीन खुलासे होत आहेत. निदा खान ही धर्मांतरणाच्या षडयंत्राची मास्टरमाईंड आहे. ती कार्यालयात दबंग सारखी वागायची. महिला कर्मचारी तिला घाबरून असायच्या. तर पुरूष कर्मचाऱ्यांनाही ती धमकवायची. इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ती मनमानी करायची. ती महिला कर्मचाऱ्यांना बुर्का कसा परिधान करायचा याचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर जे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माची विचारसरणी अंगिकारण्यास सांगायचे त्यांच्या पाठीशी निदा खान कायम असायची. धर्मांतरणासाठी ती विविध प्रकारे दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलीस निदा खान हिला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. उलट तिने कोर्टात जामीनासाठी धाव घेतली आहे. म्हणजे ती पोलिसांवर शिरजोर ठरल्याचा आरोपही होत आहे. तर तिला कुणाचे अभय आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group