''या'' क्रिकेटपटूला अटक ! 3 वर्षांपासून रिलेशन, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध,अन...
''या'' क्रिकेटपटूला अटक ! 3 वर्षांपासून रिलेशन, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध,अन...
img
Nandini khandare More
क्रिकेट विश्वातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करण्याच्या अनेक घटना घडत असतात.दरम्यान आता अशाच प्रकरणातून एका क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बंगालच्या क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून फसवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका वैद्यकीय विद्यार्थिनीने अभिषेक पोरेलवर लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणे, मारहाण करणे आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, दमदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामी सिटी येथून अभिषेक पोरेलला ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, महिलेने केलेल्या आरोपांमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

हुगळीचे पोलीस अधीक्षक कुंवर भूषण सिंह यांनी अभिषेक पोरेलच्या अटकेची पुष्टी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, एका महिलेने जून महिन्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत महिलेने आरोप केला की, अभिषेक पोरेलने तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या विश्वासावर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्यावर पोरेलने तिच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. याच काळात त्याने आपल्याला मारहाण केली आणि धमकी दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे.

3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा 

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती आणि अभिषेक पोरेल गेल्या जवळपास तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरुवातीला दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होतं. मात्र, गेल्या वर्षापासून त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण होण्यास सुरुवात झाली. महिलेचा दावा आहे की, अभिषेकने तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. याशिवाय, आपल्याला मारहाण करण्यात आली आणि धमकावण्यात आल्याचाही गंभीर आरोप महिलेने केला आहे.

हायकोर्टाच्या निर्देशानंतर अटक

या प्रकरणात कलकत्ता हायकोर्टाने पोलिसांना अभिषेक पोरेलला अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, महिलेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, अभिषेक पोरेलने यापूर्वी स्वतःवर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातूनच स्पष्ट होणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group