छतावरून उडी मारली अन् थेट घरात घुसून माय-लेकींना धमकावलं; 'त्या' तरुणाचा केजमध्ये फिल्मी स्टाईल राडा!
छतावरून उडी मारली अन् थेट घरात घुसून माय-लेकींना धमकावलं; 'त्या' तरुणाचा केजमध्ये फिल्मी स्टाईल राडा!
img
नितीशा कुलकर्णी




गुन्हेगारीच्या सतत नव नविन घटना या कानावर पडत असतात. बिड जिल्ह्यातील केजमध्ये एका तरुणाने जबरदस्ती घरात घुसून तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लाऊन द्या, अन्यथा तिच्या वडिलांना ठार मारेन, अशी धमकीच दिल्याची घटना समोर आली आहे.

राज्यात गेल्या वर्षभरापासून बीड (Beed) जिल्हा विविध गुन्हेगारी घटनांनी लक्षवेधी ठरला असून अद्यापही बीडमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत. जिल्ह्यातील केजमध्ये एका तरुणाने जबरदस्ती घरात घुसून तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लाऊन द्या, अन्यथा तिच्या वडिलांना ठार मारेन, अशी धमकीच दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून दुसऱ्या घटनेत अंबाजोगाई येथे लग्नाचे आमिष दाखवून 28 वर्षीय महिलेवर गेल्या 2 वर्षांपासून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या दोन्ही प्रकरणात पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.बीडच्या केज तालुक्यातील एका खेडेगावात एका तरुणाने सायंकाळी घराच्या पाठीमागून प्रवेश करुन मायलेकींना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी तरुणाने छतावरुन उडी मारून घरात प्रवेश केला. "तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या, नाहीतर तिच्या वडिलांना जीवे मारीन," अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.

अंबाजोगाईतील महिलेची फिर्याद

अंबाजोगाईतून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप उघडकीस आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने विवाहासाठी धर्मांतराची सक्ती करत धमक्या दिल्या. आता, याप्रकरणी सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सदरील महिला आणि आरोपी तीन वर्षापासून सोबत राहत होते. फिर्यादी महिला विवाहित असून तिला चार अपत्य असल्याची माहितीही,  पोलिसांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, शरद जोगदंड यांनी दिली. 
crime | police | Beed |
इतर बातम्या
Join Whatsapp Group