२५ एप्रिल २०२६
अनेकदा अपघाता हे चालकाचा ताबा सुटल्याने किंवा वाहनाचा वेग आटोक्यात न आल्याने होतात. पनवेल मधून अशीच एक घटना समोर येतेय. पनवेलमध्ये वेगात कार चालवताना एका चालकाचा ताबा सुटला आणि किरकोळ कारणावरून वाद झाला. संतापलेल्या चालकाने कारची डिकी उघडून भयंकर कृत्य केलेलं आहे.
रात्रीचा शांत रस्ता आणि अचानक घडलेली घटना. पनवेल परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अतिशय छोट्या कारणावरुन सुरु झालेला हा वाद काही क्षणात इतका वाढला की एका कारचालकाने संतापाच्या भरातच महिलेवर हल्ला केला आहे.
घरी परतताना वाटेतच काळ आडवा आला
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना 23 एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीची आहे. पायल चौधरी असे महिलेचे नाव असून त्या रिसवाडी परिसरात राहतात. त्या रात्री साधारण साडेबाराच्या सुमारास त्या मोटारसायकलवरुन कळंबोली येथून रसायनीकडे त्यांच्या घरी जात होत्या. दरम्यान रस्ता अरुंद असल्याने वाहनांना पुढे जाण्यास अडचण येत होती.
नेमकी पळस्पे फाटाजवळ त्यांच्या मागून एक चारचाकी वाहन वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या रस्ता कमी असल्याने दोन्ही वाहनांमध्ये थोडा अडथळा निर्माण झाला. यावरुन तो कारचालक चिडला आणि खाली उतरत पायल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
महिलेवर वार करून आरोपी कारचालक फरार
धक्कादायक म्हणजे वाद वाढत गेला आणि त्याने गाडीच्या डिकीतून लोखंडी स्टिक आणि चाकू बाहेर काढला. कोणतीही पर्वा न करता पायल यांच्या हातावर जोरात वार केले. या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाल्या.
या घटनेनंतर कार चालक तिथून पळून गेला. पायल यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस त्या आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरु केला आहे.
Copyright ©2026 Bhramar