अंबाबाईच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला ! कार-ट्रकची भीषण धडक; चौघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी
अंबाबाईच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला ! कार-ट्रकची भीषण धडक; चौघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी
img
Nandini khandare More

अंबाबाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या सात मित्रांचा प्रवास दुर्दैवी ठरला. कराडजवळ कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. हसत-खेळत देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांपैकी चौघे पुन्हा कधीच घरी परतणार नाहीत, या विचाराने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

साताऱ्यामध्ये या भीषण अपघाताची घटना घडली. अंबाबाईच्या दर्शनावरून परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कराड शहराजवळ पुणे- बंगळुरू महामार्गावर झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघेही जिवल मित्र आणि एकाच गावातील होते. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. सध्या सातारा पोलिस या अपघाताच तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कराड शहराजवळ हा अपघात झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावर उड्डाणपूलावर रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. दर्शनाहून परताना हा भीषण अपघात झाला.

अपघातातील सर्व तरुण साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे आहेत. कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुला केला असून हा या उड्डाणपुलावरील पहिलाच भीषण अपघात आहे. जखमी तरुणावर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group