अलीकडे अनेक भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईच्या सेक्टर 10 मध्ये हा भीषण अपघात घडला आहे. कारवरील नियंत्रण सुटलेल्या चालकाने 8 ते 10 जणांना उडवलं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 10 जणांना उडवल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात काही जणांची प्रकृती स्थिर आहे. तर काही जणांची चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा सुरू केला. त्यानंतर फरार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघातामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर एका कारचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तर काहींना जखमींना रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. अपघातानंतर दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.