नाशिक : भीषण अपघातात जिवलग मित्रांवर काळाचा घाला, परिसरात हळहळ
नाशिक : भीषण अपघातात जिवलग मित्रांवर काळाचा घाला, परिसरात हळहळ
img
वैष्णवी सांगळे
नांदुरी येथील दोन युवकांवर काळाने घाला घातलाय. कामानिमित्त अभोणा येथे जात असताना अभोणा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश वाघ आणि महेश गायकवाड हे दोघेही युवक सप्तश्रृंगी गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. कामानिमित्त अभोणा येथे जात असताना अभोणा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. पुणे येथील काही युवक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन अभोण्याकडे जात असतांना त्यांना अपघातस्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसले. 

२०२३च्या हिंसाचारानंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये; रेल्वे कामांसाठी दिले २७ हजार कोटी

यानंतर त्यांनी या दोघांनाही स्थानिकांच्या मदतीने अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र, उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्य झाला. तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?' वीर पत्नीचा सवाल ; सामना पाहण्यासाठी टीव्ही देखील चालू करु नका...

दरम्यान, योगेश वाघ यांच्यावर शुक्रवारी रात्री दहा वाजता आणि महेश गायकवाडवर आज (शनिवारी) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. 



इतर बातम्या
Join Whatsapp Group