राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे.
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील जानुगडेवाडी परिसरात एसटी बसचा झाडाला आदळल्याने भीषण अपघात घडला.
यावेळेस बसमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे ३० जण प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींवर ढेबेवाडी ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर बस चालकाने पलायन केले आहे. सध्या पोलिसांकडून बस चालकाचा शोध सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सळवे येथून निघालेली बस पाटणच्या दिशेनं जात होती.
दरम्यान, जानुगडेवाडी नजीक असलेल्या धोकादायक वळणावरून जात असताना कराडकडून अचानक प्रवासी बस आली. प्रवासी बसला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना एसटी बस चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट झाडावर आदळली.
या अपघातात एसटी बस चालक आरिफ निजाम मुल्ता आणि वाहक आर.एम. काळे यांच्यासह एकूण तीस प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.
गंभीर जखमींमध्ये: निर्मला अशोक मगरे पल्लवी अमित पवार संभाजी सिताराम कुंभार, या प्रवाशांना पुढील उपचारासाठी कराडला हलवण्यात आलं आहे.
जखमी प्रवाशांमध्ये सरिता धनाजी जाधव, सीताबाई नायकु मगरे, बाळाबाई मगरे, शोभा जाधव, छाया तानाजी जाधव, तुकाराम यादव, संपदा पुजारी, यश बोरगे, श्रावणी पाटील, आराध्या पाटील, समर्थ जगदाळे, मालन साळुंखे यांचाही समावेश आहे.
अपघात घडल्यानंतर याची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
https://youtu.be/TR2YFR-0CzQ?si=J8gPoEEHF33Yakqn