साहित्य संमेलनाला गालबोट! विनोद कुलकर्णींवर हल्ला
साहित्य संमेलनाला गालबोट! विनोद कुलकर्णींवर हल्ला
img
वैष्णवी सांगळे
साहित्य संमेलनाला पुन्हा एकदा वादाचे गालबोट लागलेय. साताऱ्यात सुरू असणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना एका तरुणाने काळे फासण्याचा प्रकार घडला. संबंधित तरुणाचे नाव संदीप जाधव असून काळे फासण्यामागील कारण लगेच स्पष्ट झाले नाही. पण, पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकारामुळे संमेलनस्थळी एकच खळबळ उडाली.

सातारा शहरात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी संदीप जाधव हा तरुण कार्यक्रमस्थळी आला होता. आल्यानंतर त्याने संमलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासले. त्यानंतर ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली. तसेच राष्ट्रगीतही म्हटले.संदीप जाधवने कोणत्या कारणातून काळे फासण्याचा प्रकार केला हे स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले आहे. 

माझ्यावर हल्ला का झाला? याबाबत मला कोणतीही माहिती नाही. माझा प्राण गेला तरी मला पर्वा नाही. पण मी माझे काम थांबवणार नाही. पोलिसांनी आरोपींना शोधावे, अशी प्रतिक्रिया विनोद कुलकर्णी यांनी दिली. साताऱ्यात ते बोलत होते. विनोद कुलकर्णी यांच्यावर साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ला झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामधील कारण काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.
Satara |
इतर बातम्या
Join Whatsapp Group