डॉक्टर मृत्यूप्रकरणात हादरवणारा पुरावा अंधारेंनी दाखवला ,  मृत्यूनंतर स्टेटस लाईक कसं केलं ?
डॉक्टर मृत्यूप्रकरणात हादरवणारा पुरावा अंधारेंनी दाखवला , मृत्यूनंतर स्टेटस लाईक कसं केलं ?
img
वैष्णवी सांगळे
साताऱ्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात चांगलीच खळबळ उडवली आहे.  हे प्रकरण राज्यातच नव्हे देशभरात चर्चेत आहे. राहुल गांधी यांनीही याबाबत ट्विट केलं होत. महिला डॉक्टरची हॉटेल रुममध्ये हत्या झाली की आत्महत्या केली याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. 



दरम्यान डॉक्टर तरुणीने ज्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्यावरून अनेक जण संशयाच्या भोवऱ्यात असताना आज हॉटेल मालकाने स्वत: सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. त्यासोबतच हॉटेल मालकाने ही आत्महत्या नसून जाणूनबुजून मला आणि हॉटेलला बदनाम केले जात असल्याचं आज प्रसारमाध्यमांना बोलून दाखवलं. 


डॉक्टर मृत्यूप्रकरणात आता सुषमा अंधारे यांनीही शंका उपस्थित केली आहे. डॉक्टर महिलेने आत्महत्या केली नसून यामागे तिचा खून करण्यात आला असावा, अशी शंकाही उपस्थित केली आहे. हीच शंका उपस्थित करताना अंधारे यांनी आज नवे आणि खळबळजनक पुरावे सादर केले आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसचा मुद्दा उपस्थित करून गंभीर प्रश्न विचारले आहेत.

सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत नवे पुरावे सादर केले. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी नुकतेच डॉक्टर महिलेच्या  बहिणीला तसेच तिच्या भावाशी संपर्क केला. यावेळी मला समजलं की सातारा डॉक्टरचे प्रकरण समोर आले त्या दिवशी डॉक्टर तरुणीच्या बहिणीने तिला कॉल केला होता, असे म्हणत अंधारे यांनी पुढे गंभीर प्रश्न उपस्थित केले. डॉक्टर महिलेच्या बहिणीने केलाला फोन कॉल पोलिसांनी उचलला होता. 

डॉक्टरच्या बहिणीला वाटले की माझ्या बहिणीचा फोन चोरीला गेला. त्यामुळे बहिणीने विचारलं की माझ्या बहिणीचा फोन तुमच्याकडे कसा आला? त्यानंतर तिकडून सांगण्यात आलं की तुमच्या बहिणीने आत्महत्या केली. ही घटना संध्याकाळी सात वाजता घडली, असे सांगण्यात आले. पण मृत डॉक्टर महिलेच्या बहिणीने एक स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलेले होते. तेच स्टेटस 11 वाजून 6 मिनिटांनी मृत डॉक्टरने लाईक केलेले आहे, असे अंधारे यांनी तपशीलवार सांगितले. तसेच डॉक्टर तरुणी मृत्यू अगोदरच झालेला असेल असे सांगितले जात असेल तर मृत डॉक्टर तरुणी रात्री अकरा वाजता स्टेटस लाईक कशी करू शकतो, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी डॉक्टर महिलेने आरोग्य विभागाकडे केलेली तक्रार आणि तिच्या तळहातावर लिहिलेल्या शेवटच्या संदेशाच्या हस्ताक्षराची तुलना केली. एकच मुलगी दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे शब्द कसा लिहू शकते, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.

Satara |
इतर बातम्या
Join Whatsapp Group