फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI बदनेची चलाखी , 'हा' महत्त्वाचा पुरावा लपवला
फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI बदनेची चलाखी , 'हा' महत्त्वाचा पुरावा लपवला
img
वैष्णवी सांगळे
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील संशयित PSI गोपाल बदने याची चलाखी समोर आली आहे. पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्याने महत्त्वाचा ठरणार एक पुरावा लपवलाय. 



या प्रकरणातील दोन मुख्य संशयित  आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयित  आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी घरातून अटक केली तर पीएसआय गोपाल बदने दोन दिवस फरार होता. त्यानंतर तो फलटण पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला. गोपाल बदने सध्या फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलीस कोठडीत आहे. या दोन दिवसात त्याने एक मोठे काम केले. 

महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती मिळताच संशयित आरोपी गोपाल बदने हा फरार होता. आधी पंढरपूर  त्यानंतर त्याने सोलापूर गाठले आणि नंतर कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो बीडला गेला. शेवटी संशयित आरोपी मध्यरात्री फलटण पोलिस ठाण्यात जाऊन सरेंडर झाला. या दरम्यान, गोपाल बदनेने महिला डॉक्टर प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणजेच त्याचा मोबाईल लपवला.

पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्याचा मोबाईल गोपाल बदनेने लपवला आहे. पोलिसांपासून मोबाईल कुठे आहे, याबाबतची माहिती बदने लपवत आहे. आरोपी आणि महिला डॉक्टरचे नेमके संबंध काय? याचा तपास करण्यासाठी या गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा गोपाल बदनेचा मोबाईल असणार आहे. तर दोन्ही आरोपींनी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे.
Satara |
इतर बातम्या
Join Whatsapp Group