साताराच्या कोरेगाव तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत कार्यालयात धक्कादायक घटना घडली. थेट ग्रामसभेत तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. सभेतील चर्चेत काही लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेत अन्याय झाल्याची तक्रार मांडली. या मुद्द्यावरून उपस्थितांमध्ये बोलाचाली वाढली. यातून थेट एकाला मारहाण करण्यात आल्याने हाणामारीपर्यंत विषय गेला.
नायगाव येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे व मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. ग्रामसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान अचानक उपस्थितांमध्ये वाद निर्माण झाला. यामध्ये तुंबड हाणामारी झाल्याचे पाहण्यास मिळाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ ग्रामसभेचे वातावरण तणावपूर्ण झाले.