भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कंबरेला हात लावून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैया सेवा करे हे त्यानं नवीन गाणं नुकतीच रिलीज झालं. या गाण्याच्या निमित्तानं तो त्याची सहअभिनेत्री अंजली राघवसोबत दिसला. गाण्याच्या प्रमोशनवेळी त्याने अंजलीच्या कंबरेला हात लावला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पवनसिंहची बायको मात्र चांगलीच संतापली आहे. पवन सिंहच्या बायकोची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याच्यातील कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आलेत. माझ्याकडे आता जीव देण्याशिवाय पर्याय नाहीये असं म्हणत त्याच्या बायकोनं संपात व्यक्त केला आहे.
ज्योतीने लिहिले आहे की, "आदरणीय पती पवन सिंह, मी अनेक महिन्यांपासून तुमच्याशी काही कौटुंबिक आणि राजकीय मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तुम्ही किंवा तुमच्यासोबत राहणाऱ्या लोकांना कदाचित माझे कॉल आणि मॅसेजेसना उत्तर देणे योग्य वाटले नसेल. मी तुम्हाला भेटण्यासाठी लखनौला गेले होते. छठच्या वेळी तुम्ही देहरीला आलात तेव्हाही मला तुम्हाला भेटायचे होते. पण तुम्ही मला भेटण्यास नकार दिला.
तिने पुढे लिहिले, मी असे कोणते मोठे पाप केले आहे ज्यासाठी मला एवढी मोठी शिक्षा दिली जात आहे. तुम्ही माझ्या पालकांच्या भावनांशी खेळत आहात. जेव्हा मी तुमच्या लायक नाही किंवा नव्हती, तेव्हा तुम्ही मला तिथेच सोडून द्यायला हवे होते कारण तुम्ही पूर्वी माझ्यापासून दूर गेला होता. खोटे आश्वासन देऊन, तुम्ही मला तुमच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्यासोबत आणले आणि आज तुम्ही मला आयुष्याच्या इतक्या शिखरावर आणले आहे की मी आत्मदहन करण्याशिवाय काहीही विचार करू शकत नाही. पण मी हे करू शकत नाही कारण मला माहित आहे की मी जरी आत्मदहन केले तरी प्रश्नचिन्ह माझ्यावर आणि माझ्या पालकांवरच उभे राहतील."