मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाइन टॉम चाको पुन्हा एकदा ड्रग्जच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. केरळ पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्याच्या विरोधात ड्रग्जचे सेवन करण्याच्या प्रकरणात केरळ मधील एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये चार तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , २०१५ मधील ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात २०१५ मध्ये शाइन टॉम चाको आणि चार महिला मॉडेल्सना कोचीतील एका फ्लॅटमध्ये ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. पोलिसांनी त्यावेळी सुमारे ७ ग्रॅम कोकेन जप्त केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावेळी पुराव्याच्या अभावाने अभिनेत्याला निर्दोष घोषित केले होते.
शाइन टॉम चाकोवर पुन्हा एकदा ड्रग्जचे सेवन केल्याचा करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात नवीन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाची चौकशी होणार आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.
शाइन टॉम चाकोच्या विरोधातील चौकशी अद्याप सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणते पुरावे सादर केले आहेत, आणि न्यायालयात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.