सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खोल समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू, सिनेसृष्टीवर कोसळला दुःखाचा डोंगर
सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खोल समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू, सिनेसृष्टीवर कोसळला दुःखाचा डोंगर
img
Vaishnavi Sangale
जगप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि “द कॉस्बी शो” मधील लोकप्रिय पात्र ‘थिओ’ साकारणारे माल्कम-जमाल वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला असून त्यांच्या अचानक जाण्याने जागतिक मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

माल्कम वॉर्नर हे आपल्या कुटुंबासह कोस्टा रिका येथे सुट्टीसाठी गेले होते. तेथे समुद्रात पोहत असताना तीव्र प्रवाहामुळे ते वाहून गेले, आणि त्यानंतर त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक न्याय विभागाने (OIJ) दिली आहे. रेड क्रॉसच्या जीवरक्षकांनी वॉर्नर यांना घटनास्थळी मृत घोषित केलं. या प्रकरणी अद्याप कुटुंबीय किंवा प्रतिनिधींनी कोणताही अधिकृत खुलासा दिलेला नाही.

बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाचा भीषण कार अपघात, व्हिडीओ व्हायरल

1980 च्या दशकातील सुपरहिट अमेरिकन मालिका ‘The Cosby Show’ मध्ये त्यांनी साकारलेली थिओ हूक्स्टेबल ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि कौटुंबिक मालिका विश्वातील हसते-खेळते व्यक्तिमत्त्व म्हणून वॉर्नर यांना अपार लोकप्रियता मिळाली होती. वॉर्नर यांना 2012 मध्ये “Reed Between the Lines” या मालिकेसाठी NAACP Image Award अंतर्गत सर्वोत्तम कॉमेडी अभिनेता पुरस्कार प्राप्त झाला होता. ते अनेक अमेरिकन टीव्ही मालिकांमध्ये झळकले असून त्यांनी कॉमेडी, कौटुंबिक ड्रामा आणि सामाजिक विषयांवर आधारित अभिनयाच्या क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली होती.
actor | death |
इतर बातम्या
Join Whatsapp Group