भीषण अपघात...! लग्न समारंभातून परतताना ५ डॉक्टरांचा मृत्यू , तर एक गंभीर जखमी ; कुठे घडली घटना?
भीषण अपघात...! लग्न समारंभातून परतताना ५ डॉक्टरांचा मृत्यू , तर एक गंभीर जखमी ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते प्रवास करत असलेली स्कॉर्पियो भरधाव वेगाने दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते. आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे वर कन्नौजजवळील तिर्वा येथे हा अपघात झाला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हे डॉक्टर प्रवास करत असलेली भरधाव स्कॉर्पियो दुभाजकावर आदळून दुसऱ्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. 

दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे. तसेच हे सर्वजण लखनौमधील एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सैफई येथे परतत असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर एखजण गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group