इगतपुरी : वाडीवऱ्हेजवळ पिकअप उलटली ; १० ते १५ जण जखमी
इगतपुरी : वाडीवऱ्हेजवळ पिकअप उलटली ; १० ते १५ जण जखमी
img
वैष्णवी सांगळे

दैनिक भ्रमर ( प्रतिनिधी इगतपुरी ) - आज सकाळी ७ वाजता वाडीवऱ्हे कडून बेलगाव कुऱ्हे - अस्वली कडे जाणाऱ्या पिकअपचे स्टेरिंग लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. MH 15 CK 0305 असा अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे. या अपघातात पिकअप उलटल्याने वाहनातील १० ते १५ जण जखमी झाले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमी व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा ! 

या अपघातात शिवनाथ बारकू चव्हाण (वय ४३ रा. माणिकखांब), सुनील रामदास कुंदे (वय २१), प्रवीण रामनाथ केकरे ( वय २१), बळीराम सुदाम केकरे (वय २२ रा. आंबेवाडी), सखाराम रामदास कुंदे (वय २२), प्रकाश एकनाथ क्षीरसागर (वय ५०), गोरख तांगडे (वय ४५), बाळू दादू वारघडे (वय ३५ रा. मुंढेगाव), गोरख नामदेव ठवळे (वय ३०), राहुल ढवळे (वय २२) हे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group