‘सूर्यकिरण’ एअर शोच्या उद्याच्या वेळेत बदल;
‘सूर्यकिरण’ एअर शोच्या उद्याच्या वेळेत बदल;
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- कमी दृश्यमानता (Low Visibility) लक्षात घेता उद्या दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर्यकिरण’ (SKAT) एअर शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आता दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळी सकाळी ११ वाजेपासून प्रवेश खुला केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

ज्या प्रेक्षकांनी आपली आसन व्यवस्था राखीव केली आहे, त्यांनी प्रवेश प्रक्रिया व आसन व्यवस्थेची सुरळीत अंमलबजावणी होण्यासाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. तसेच प्रेक्षकांनी स्वतःच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, टोपी व सनग्लासेस सोबत ठेवावेत. कार्यक्रमस्थळी सुरक्षा तपासणी तसेच आपत्कालीन सेवांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.

भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचे चित्तथरारक प्रात्यक्षिक प्रेक्षकांना स्पष्टपणे पाहता यावे, या उद्देशानेच कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group