नाशिक : मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीकडून झडती
नाशिक : मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीकडून झडती
img
वैष्णवी सांगळे
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले होते. 

मंत्रालयातील या लाच प्रकरणाने सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून घराची झडती घेतलीय. यामध्ये एसीबीच्या हातात महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आली आहे.

राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे तो प्रतिनियुक्तीवर आला होता. दरम्यान , एसीबीला ढेरिंगेच्या घरातून महत्त्वाची आणि संशयास्पद कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group