नाशिक :- संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ प्राधान्य विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार दि. 21/02/2026 व रविवार दि.22/02/2026 रोजी दोन दिवसांचा शट डाऊन घेण्याचे नियोजित करण्यात आलेले होते.
त्यासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत सर्व सहा विभागांकडुन व स्मार्ट सिटी मार्फत करावयाच्या कामांची यादी कार्यालयीन पत्रान्वये मागविण्यात आलेली होती. तथापी गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रापावेतो नव्याने टाकण्यात आलेल्या 900 मी.मी. व्यासाची जलवाहीनी कार्यान्वीत करण्याचे हेतुने अस्तित्वातील जलवाहीनीवर गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे 1200 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शन करणे व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर फाऊंटनकडे जाणाऱ्या लाईनवर क्रॉस कनेक्शन करणे त्याचप्रमाणे व इतर आवश्यक अन्य मोठया स्वरुपांच्या कामांसाठी आवश्यक असलेले साहीत्य जागेवर विहीत कालावधीत उपलब्ध होऊ न शकले नाही.
त्यामुळे शनिवार दि. 21 व रविवार दि.22 रोजीचा नियोजित प्रस्तावित शट डाऊन रद्द करण्यात आलेला आहे. त्याबाबतचे फेर नियोजन करुन लवकरच त्याचा दिनांक सर्व नागरीकांना माहीतीस्तव कळविण्यात येईल, असे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे.