नाशिक : रिंगरोडसाठी 140 हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी, पन्नास टक्के भूसंपादन होताच रिंग रोडसाठी निघणार निविदा
नाशिक : रिंगरोडसाठी 140 हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी, पन्नास टक्के भूसंपादन होताच रिंग रोडसाठी निघणार निविदा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आगामी सिंहस्थानिमित्त 65.5 किलोमीटरचे बाह्य रिंग रोड निर्माण केले जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या 366 हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत 140 हेक्टर क्षेत्राचे संमतीद्वारे थेट भुसंपादन करण्यात आले आहे.

रस्ते प्रकल्पासाठी 100 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय रस्ते कामासाठी निविदा काढता येत नसली तरी, या रिंग प्रकल्पासाठी राज्य सरकारने 100 टक्के भूसंपादनाची अट हटवून 50 टक्के भूसंपादन झाले, तरी निविदा काढण्याबाबतचा आदेश पारित केला आहे. या प्रकल्पामुळे चालना मिळेल, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

देश-विदेशातून कुंभमेळ्या-साठी सुमारे दहा कोटी भाविक येण्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. दरम्यान वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तीन तालुक्यांमध्ये 65.5 किलोमीटरचे बाह्य रिंग रोड तयार केले जाणार आहे. परंतु बहुतेक गावांमध्ये या रिंग रोडला विरोध होत आहे. शेतकर्‍यांच्या तीव्र विरोधामुळे आतापर्यंत केवळ 140 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण होऊ शकले आहे. या विरोधामुळे कामाला उशीर होऊ नये, यासाठी राज्य सरकारने रिंग रोडला विशेष सवलत दिली आहे.

29 ऑगस्ट 2016 च्या परिपत्रकानुसार 100 टक्के भूसंपादनाची अट शिथिल  करून 50 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाला चालना मिळून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.  

या प्रकल्पासाठी जमीन मालकांची हरकत नसल्यास जमीन मालकाकडून संमतीने थेट जमीन खरेदी केली जात आहे. जमीन संपादित करताना संमती असल्यास जिल्हा प्रशासनाकडून जमीन मालकांना शासन नियमानुसार 25 टक्क्यांचा अधिकचा मोबदला देऊन जमीन खरेदी केली जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group