होळीसाठी रेल्वेच्या 30 विशेष गाड्या, उत्तर भारतीय नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
होळीसाठी रेल्वेच्या 30 विशेष गाड्या, उत्तर भारतीय नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
img
दैनिक भ्रमर
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- उत्तर भारतातील सवा;ंत मोठा उत्सव समजल्या जाणार्‍या होळी सणासाठी मुंबई व विविध उपनगरीय भाग, तसेच विविध शहरांतून आपल्या गावी जाणार्‍या उत्तर भारतातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन होळीनिमित्त विशेष 30 गाड्या चालविणार असून, उत्तर भारताकडे जाणार्‍या नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. दि. 26 फेब्रुवारी ते 24 मार्चपर्यंत या गाड्या चालणार असल्याने त्यांची परतीच्या प्रवासाचीही सोय होणार आहे.

रेल्वे होळी उत्सव या गाड्या पुढीलप्रमाणे धावतील -एलटीटी मुंबई ˆ सुलतानपूर/वाराणसीदरम्यान 8 विशेष फेर्‍या. एलटीटी रक्सौल/सहरसा/धनबाद दरम्यान 22 गाड्या. एलटीटी सुलतानपूर/वाराणसी 8 गाड्या. एलटीटी ˆसुलतानपूर एसी विशेष 4 फेर्‍या. गाडी क्र. 04211 एलटीटी येथून 27 फेब्रुवारी व 3 मार्चला 14.35 वाजता सुटेल व सुलतानपूर येथे दुसर्‍या दिवशी 23 वाजता पोहोचेल. (2 फेर्‍या). गाडी क्र. 04212 सुलतानपूर येथून 26 फेब्रुवारी व दोन मार्चला 04.00 वाजता सुटेल व एलटीटी मुंबई येथे दुसर्‍या दिवशी 12.20 वाजता पोहोचेल. (2 फेर्‍या) थांबे : ठाणे, कल्याण, नाशिकरोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल व लखनौ.

एलटीटी वाराणसी एसी विशेष (4 फेर्‍या)-गाडी क्र. 04225 एलटीटी मुंबई येथून 26 फेब्रुवारी व 2 मार्चला 14.35 वाजता सुटेल व वाराणसी येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 02.05 वाजता पोहोचेल. (2 फेर्‍या). गाडी क्र. 04226 वाराणसी येथून 25 फेब्रुवारी व 1 मार्चला 01.35 वाजता सुटेल व एलटीटी मुंबई येथे दुसर्‍या दिवशी 12.20 वाजता पोहोचेल. (2 फेर्‍या).थांबे: ठाणे, कल्याण, नाशिकरोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, सुलतानपूर व जौनपूर सिटी.

एलटीटी रक्सौल/सहरसा/धनबाद सेवांचा होळी विशेष विस्तार (22 फेर्‍या) एलटीटी मुंबई रक्सौल एलटीटी (8 फेर्‍या). गाडी क्र. 05558 एलटीटीˆरक्सौल पर्यंत चालविण्यात येणारी ही गाडी आता होळी विशेष म्हणून 12 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान दर गुरुवारी चालविण्यात येईल. (4 फेर्‍या). गाडी क्र. 05557 रक्सौलˆएलटीटी विशेष गाडी 10 ते 31 मार्चदरम्यान दर मंगळवारी चालविण्यात येईल. (4 फेर्‍या). एलटीटी सहरसा एलटीटी 8 फेर्‍या-गाडी क्र. 05586 (एलटीटीˆसहरसा विशेष) 8 ते 29 मार्च दरम्यान दर रविवारी चालविण्यात येईल. (4 फेर्‍या). गाडी क्र. 05585 सहरसाˆएलटीटी विशेष 6 ते 27 मार्च दरम्यान दर शुक्रवारी चालविण्यात येईल. (4 फेर्‍या)

एलटीटी धनबाद एलटीटी (6 फेर्‍या)- गाडी क्र. 03380 एलटीटीˆधनबाद विशेष 12 ते 26 मार्च दरम्यान दर गुरुवारी चालविण्यात येईल. गाडी क्र. 03379 धनबादˆएलटीटी विशेष 10 ते 24 मार्च दरम्यान दर मंगळवारी चालविण्यात येईल. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group