आंतरशालेय जलतरण स्पर्धेत निवेकच्या जलतरणपटूंचे यश
आंतरशालेय जलतरण स्पर्धेत निवेकच्या जलतरणपटूंचे यश
img
दैनिक भ्रमर


नाशिक (प्रतिनिधी) :- दिल्ली पब्लिक स्कूल येथे झालेल्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेत निवेकच्या जलतरणपटूंनी यश संपादित केले आहे. 

या स्पर्धेत निवेकच्या ६ जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पाच गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेत निवेकच्या आरा उगावकर हिने फ्री स्टाईल व बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये सुवर्ण, आभा उगांवकर हिने बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये कांस्य, आदित शाह याने ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्य, तर पृथ्वी बच्छाव याने ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.

या सुवर्ण जलतरणपटूंचा निवेक क्लब येथे उद्योजक महेंद्र छोरीया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हे सर्व जलतरणपटू  प्रशिक्षक हिरेन बुझरूक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असतात. 

इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group