नाशिकमध्ये आज दिवसभरात
नाशिकमध्ये आज दिवसभरात "इतक्या" वाहनचालकांवर कारवाई
img
दैनिक भ्रमर
नाशिक शहर वाहतूक विभागाने ई चलन द्वारे बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली आहे.

शहरातील 40 प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सिग्नल तोडणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडून गाडी उभी करणे, वेग मर्यादा भंग करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणे अशा प्रकारांवर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. ही मोहीम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे.

आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 75 वाहन चालकांवर ई चलन कारवाई करण्यात आलेली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी पासून एकूण 305 वाहनांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group