मोठी बातमी ! नाशिक शहरातील वृक्षतोडीला ‘या’ तारखेपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती
मोठी बातमी ! नाशिक शहरातील वृक्षतोडीला ‘या’ तारखेपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती
img
वैष्णवी सांगळे
नाशिककरांसाठी आणि पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील सर्वच भागातील वृक्ष तोडीला राष्ट्रीय हरित लवादाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच याबाबत नाशिक महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाला २८ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील कुठलीही झाडे तोडता येणार नाहीत.

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील अनेक भागातील झाडे महापालिकेकडून तोडली जात आहे. ही झाडे तोडण्याला पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी झाली असता हरित लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे २८ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील कुठलीही झाडे तोडता येणार नाहीत. 

नाशिक शहरात रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल आणि इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड प्रस्तावित आहे. यामध्ये अनेक पुरातन आणि डेरेदार वृक्षांचा समावेश असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान हरित लवादाच्या वृक्षतोडीला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोडीविरोधात लढा देणाऱ्या पर्यावरणप्रेमींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group