मी टू चळवळीत अनू मलिकला रुपाली चाकणकरांनी क्लीनचिट दिली, त्यानंतर... , सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर पुन्हा गंभीर आरोप
मी टू चळवळीत अनू मलिकला रुपाली चाकणकरांनी क्लीनचिट दिली, त्यानंतर... , सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर पुन्हा गंभीर आरोप
img
वैष्णवी सांगळे
आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकमध्ये एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवले. त्यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत जास्त फोटो आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचेही अशोक खरातसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच, रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

रुपाली चाकणकरांवर पुन्हा गंभीर आरोप 
मी टू चळवळ सुरू असताना गायक आणि दिग्दर्शक अनु मलिक यांच्याविरोधात महिलांनी तक्रार केली होती. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी अनु मलिकला क्लीन चिट दिली होती, त्यामुळेच सोहम चाकणकर याला अनु मलिकांच्या फिल्ममध्ये काम मिळले होते, सोहम हा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 



अनु मलिक यांच्याविरुद्ध सिनेसृष्टीतील दोन ते तीन महिलांनी तक्रार दिली होती. अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, त्या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. रुपाली चाकणकर जर अशी डील करत असतील तर हे वाईट आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फोटोच दाखवले. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group