अशोक खरातचा पाय आणखी खोलात ; संतती प्राप्तीसाठीही भोंदू अशोक खरातचे टोटके, गर्भवती महिलेवर...
अशोक खरातचा पाय आणखी खोलात ; संतती प्राप्तीसाठीही भोंदू अशोक खरातचे टोटके, गर्भवती महिलेवर...
img
वैष्णवी सांगळे
सिन्नरमधील भोंदूबाबा उर्फ स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खाणारा भोंदू अशोक खरात याची कृत्ये पाहून आणि ऐकून कोणालाही संताप अनावर होईल. माणुसकीला काळिमा फासणारी खराटचे अनेक कांड आता हळूहळू समोर येण्यास सुरुवात झाली आहे. 



अशोक खरातवर आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झाले आहेत. स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या कॅप्टन खरातच्या अडणची आता आणखीनच वाढणार आहेत. त्याच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा अंतर्गत (पीसीपीएनडीटी ) गुन्हा दाखल होऊ शकतो, एवढंच नव्हे तर वन्यजीव संरक्षण प्रतिबंधक कायदा अंतर्गतही त्याच्यावर कलमं लागू शकतात. त्यामुळे आता त्याची पोलिसांच्या तावडीतून सुटका होण्याची शक्यता अगदी धूसर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरात याच्यावर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीसीपीएनडीटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. मुलगा हवा की मुलगी.. असं म्हणत त्याने संतती प्राप्तीसाठी अनेक टोटके केल्याचे उघड झाले आहे. एवढंच नव्हे तर त्याने सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर पूजा विधीच्या नावाखाली अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता, त्यासंदर्भात त्याच्यावर दुसरा गुन्हाही दाखल झाला होता.

एवढंच नव्हे तर खरात याने वेगवेगळ्या वन्य जीवांची कातडी वापरल्याचाही उल्लेख असल्याने, त्याच्यावर वन्यजीव संरक्षण प्रतिबंधक कायदा अंतर्गतही कलमं लागू शकतात. आता असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यास खरात याची पोलिसांच्या तावडीतून सुटण्याची शक्यता अतिशय धूसर आहे. 

अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून खरातची कसून चौकशी सुरू आहे. तसेच शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली असून त्यातून अनेक खुलासे होणार आहेत. त्याच्या फार्महाऊसवरील कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. दरम्यान सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातचा पाय खोलात गेला आहे, कारण त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल होऊ शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group