मोठी बातमी : अशोक खरातचे तब्बल 'इतके' व्हिडीओ सापडले,  तपासात पिस्तुल, काडतुसं अन...
मोठी बातमी : अशोक खरातचे तब्बल 'इतके' व्हिडीओ सापडले, तपासात पिस्तुल, काडतुसं अन...
img
वैष्णवी सांगळे

 नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या करानाम्याने राज्य हादरले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्याचे बिंग फुटले. तर त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी लागेबंध समोर आले आहे. त्याच्यासोबत अनेक मंत्री, आमदारांचे फोटो समोर येत असल्याने वातावरण तापले आहे. दरम्यान त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ हाती लागले होते.पण हा आकडा आता वाढला आहे. त्यामुळे याप्रकरणाचे जाळे दूरपर्यंत असल्याचे समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुमारे दीड तास आढावा बैठक घेतली. या SIT मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे 100 हुन अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी कॅप्टन खरातच्या विविध ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. झाडाझडतीदरम्यान दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या कॅप्टन खरातविरुद्ध दाखल तीन गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा, वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा, तर शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 



इतर बातम्या
Join Whatsapp Group