नाशिक : अशोक खरात प्रकरणात माजी मंत्र्याच्या निकटवर्तीला पोलिसांनी उचललं, चौकशी सुरू
नाशिक : अशोक खरात प्रकरणात माजी मंत्र्याच्या निकटवर्तीला पोलिसांनी उचललं, चौकशी सुरू
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून २४ मार्चपर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अशोक खरात मुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक बड्या नेत्यांशी संबंध असलेला खरात चांगलाच अडचणीत आला असून संबंधित नेतेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. 



एकीकडे रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्र्याचं कनेक्शन समोर आलं आहे. दीपक लोंढे असं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. आरोपी अशोक खरात याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेहिशोबी माया जमवली आहेत. या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात दीपक लोंढे याने मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलिसांनी चौकशीसाठी दीपक लोंढेला ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

कोण आहे दीपक लोंढे?
दीपक लोंढे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अत्यंत सक्रिय एजंट आहेत. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी त्याचे अत्यंत जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे. अशोक खरात याच्याशी असलेल्या व्यावसायिक आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून लोंढे याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं.या चौकशीतुन महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group