अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर, एका किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा
अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर, एका किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून, आता त्याच्या आर्थिक फसवणुकीचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत. चिंचुके, बनावट खडे यानंतर आता “तुर्की मध” विक्रीच्या नावाखालीही भक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. 



भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे चौकशीदरम्यान उघड झाले असून त्याने मधाच्या नावाने अनेकांना लाखोंचा चुना लावल्याचं समोर आलं आहे.  तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून फसवणूक केली जायची. तुर्कीवरुन आणलेलं मध हे कामोत्तेजक म्हणजेच लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने खरातने या मधाची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.खरात एक किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा.

लैंगिक समस्यांसंदर्भातील अडचणी घेऊन येणाऱ्यांना खरातकडून या मधाची विक्री केली जायची. या मधाला 'एल्विश हनी' असून त्याची विक्री करताना ते तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करुन विक्री केली जायची. महागड्या दराने मध विक्री करून आलेली रक्कम त्याच्या ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती समोर आली आहे. 

अशोक खरातची सोमवारी एसआयटीकडून तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः ही चौकशी करत होत्या. अशोक खरातवर आता पर्यंत 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group