Ashok Kharat: निम्मं मंत्रिमंडळ या प्रकरणात, हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं, पण...भास्कर जाधव नक्की काय म्हणाले ?
Ashok Kharat: निम्मं मंत्रिमंडळ या प्रकरणात, हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं, पण...भास्कर जाधव नक्की काय म्हणाले ?
img
वैष्णवी सांगळे
राज्यात गाजत असलेले नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे. अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असलेला हा भोंदूबाबा महिलांवरील अत्याचाराच्या आरोपात सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणावर सुषमा अंधारे , उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांकडून भाष्य करण्यात आले आहे , पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून अनेक दावे, गौप्यस्फोट या नेत्यांनी केले आहे. दरम्यान आता या प्रकरणात भास्कर जाधव यांनी मोठा  गौप्यस्फोट केला आहे. 



अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केलाय. तसेच, याप्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. 

अधिवेशन काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये, राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं. 

खरात प्रकरणात आत्ता एसआयटी नेमल्याचं सांगितलं जातंय, पण अधिवेशनाच्या आधी SIT नेमली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे प्रकरण बाहेर आलं अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं. या प्रकरणात आयएएस, IPS अधिकारी आहेत. हे प्रकरण पोलिसांना देखील माहित होतं, म्हणून हे प्रकरण बाहेर आलं नाही, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केलाय.  

या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर गुंतले असून राज्यकर्त्यांकडून अनेकांना पाठिशी घालून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचे काम सुरू आहे. पावसाळी अधिवेशनत नाशिकमधील हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रकरणाला क्लीन चिट दिली. नाशिकमधलं प्रकरण कळायला एवढा उशीर का? असा सवालही जाधव यांनी केला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group