नाशिकमधील पावसाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने दिली
नाशिकमधील पावसाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने दिली "ही" महत्त्वाची माहिती
img
दैनिक भ्रमर

त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात कमी वेळेत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती.   

नाशिकवर आलेलं हे संकट कमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ढगफुटीचा हा भोवरा आता उत्तरेला गुजरातच्या दिशेनं तर दक्षिणेला अहिल्यानगरमधील अकोलेच्या दिशेनं सरकला आहे. 

घाटमाथा तसेच नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र, कुठेही ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही. 

जिल्ह्याच्या उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही.
खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातील दरड कोसळण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सर्व क्षेत्रीय अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित आहेत. 
अतिधोकादायक भागातील परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी येथे एसडीआरएफ (SDRF) पथक तैनात करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी नाशिकमध्ये दाखल झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group