प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणे म्हणाले, मला कोणतेही ...
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणे म्हणाले, मला कोणतेही ...
img
वैष्णवी सांगळे
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही “सडके आंबे” निघतातच, त्यामुळे सरकार महिलांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. ‘भोंदूबाबा अशोक खरात याने हिंदू धर्माचे नाव खराब केले आहे. हिंदू समाजात असे क्वचित निघतात. सरकार सर्व पीडित महिलांबरोबर आहे. खरात याच्यावर कडक कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.



खरातप्रकरणी आपल्याला समाज माध्यमावर लक्ष केले जात असल्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, ‘मला कोणतेही लक्ष केले जात नाही. समाज माध्यमावर सगळ्याच प्रकारचे प्राणी असतात. त्यामुळे मी त्याचा विचार करीत नाही. विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्यातच आनंद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

तसेच, या भोंदू बाबाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करत अधिक बोलणे टाळले. चिंचवड येथील संभाजीनगर येथे विराट हिंदू संमेलन रविवारी पार पडले. त्यानंतर मंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरातबरोबर व्हायरल झाले आहेत. अशातच या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group