Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापली? चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापली? चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
img
वैष्णवी सांगळे
गुगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना रुपाली चाकणकर मात्र अडचणीत सापडल्या आहे. 

शिवसेना (उबाठा गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे म्हणाल्या की, एका पीडितेने सांगितलं की, रुपाली चाकणकर देखील तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यावेळी रुपाली चाकणकरांनी स्वत:च्या हाताची अनामिका देखील कापली होती. 2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्या होती. यादिवशीच रुपाली चाकणकरांनी हाताची अनामिका कापल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. तसेच सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांचे यादरम्यानचे फोटोही माध्यमांसमोर दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकावर सफेद कापड गुंढाळल्याचं दिसून येत आहे. 

रुपाली चाकणकरांवर अनामिका कापल्याचा आरोप करताना ते नेमकं का केलं?, याबाबतचा पुरावा देखील वाचून दाखवला. तंत्रमंत्र विद्येत अनामिका का कापतात?, याबाबतही सुषमा अंधारेंनी सांगितलं. अनामिका का कापतात?, हे मला माहिती नव्हतं. त्याबाबतची माहिती शोधली. त्यावेळी मला धक्कादायक कारण समजली.  तंत्र-मंत्र विद्येत हाताची अनामिका (Ring Finger) अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिकेचे महत्त्वः ही बोट सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) यांच्याशी जोडलेली आहे, ज्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचे साधन बनते. 

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, रुपाली चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं आहे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. 

काही पीडित म्हणतात, चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? हे समोर येणं गरजेचं आहे. पोलिसांबरोबर आर्थिक गुन्हे शाखेने खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संपत्तीचे स्रोत तपासले गेले पाहिजे. खरातची संपत्ती परदेशात देखील आहे.रुपाली चाकणकरांना तात्काळ ताब्यात घ्यावं, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group