अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर, शंभर रूपये किलोने चिंचोके आणायचा अन एक चिंचोका १ लाखाला विकायचा
अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर, शंभर रूपये किलोने चिंचोके आणायचा अन एक चिंचोका १ लाखाला विकायचा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक सिन्नरमधील मिरगाव येथील तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला महिलेचं लैंगिक शोषण, अत्याचाराच्या गंभीर आरोपावरून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात त्याच्या अटकेनंतर बरीच धक्कादायक माहिती समोर आली असून अशोक खरातचे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आलेत. 



खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करायचा. आपल्याकडील कथित शक्तीचा वापर करत तो लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत असे. तो बाजारातून शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. ते चिंचोके कापडाने घासून स्वच्छ केल्यानंतर ते खड्यासारखे चमकायचे, हे चिंचोके खरात ऑफिसमध्ये येणाऱ्यांना मंत्र मारुन भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत विकायचा. खरातच्या निकटवर्तीयांच्या FIR मध्ये याचा उल्लेख आहे.

त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैसे उकळत होता. बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके 'दैवी शक्तीचे' असल्याचे सांगत खरातने त्यातील एक-एक चिंचोका तब्बल एक लाख रुपयांना विकलाचे तपासून समोर आलेल्या माहितीतून उघड झाले आहे. नाशिकरोड येथील एक व्यक्ती हे नकली खडे खरातला आणून देत असे.

यासह खरात पाच इंच जाड व वेगवेगळ्या लांबीचे प्लॅस्टिकचा साप, वाघाची कातडी खरेदी करायचा. या साहित्यांद्वारे भाविकांना घाबरवायचा. त्यांच्याकडून पैशांची लूट करायचा. एकप्रकारे यातून खरात लोकांच्या भावनेशी खेळत होता.


इतर बातम्या
Join Whatsapp Group