राज्यभर चर्चेत असलेले नाशिकच्या अशोक खरातचे प्रकरनाती रोज नवीन उलगडे होत आहेत या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद बाबी समोर येत आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टात काय घडलं?
अशोक खरातला कोर्टात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. सुनावणीदरम्यान SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासाची माहिती मांडताना सांगितले कि आरोपी महिलांना खडे, पेढे देऊन आणि पाण्यात काही पदार्थ मिसळून देत असे, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असे आणि त्यानंतर त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला.
याशिवाय, आरोपीच्या फार्महाऊसमधून पिस्तूल, काडतुसे, रोकड आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केल्याचेही सांगण्यात आले. तर काही विधींमध्ये नरबळीचा दिल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला. अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय असल्याचं वकिलांनी म्हटलं आहे.
बचाव पक्षाने मात्र सात दिवसांत पुरेसा तपास झाल्याचा दावा करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
तर सरकारी वकिलांनी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.इशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर गंभीर बाबींचा तपास अजून बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.