नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात करावा, म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी देणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिलेबरोबर आरोपी शिवम् नरेंद्र आढाव (रा. दसक गाव, ता. जि. नाशिक) याने ओळख निर्माण केली. “मी तुझ्यासोबत लग्न करीन व तुझ्या मुलीला सांभाळीन,” असे आश्वासन देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आढाव याने पीडितेसोबत आगरटाकळी व नांदूर गाव येथे वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले.पीडितेने गर्भपात करावा, या कारणावरून आरोपी आढाव याने पीडितेला मारहाण व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार एप्रिल 2024 ते दि. 17 मार्च 2026 दरम्यान घडला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात शिवम् आढावविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.