नाशिक : सिटीलिंक बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू
नाशिक : सिटीलिंक बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : भरधाव वेगात विरुद्ध दिशेच्या लेनमधून सिटीलिंक बस चालवून सायकलीवरून जाणार्‍या दोघांना दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 18 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास संकेत नागोजी गवळी व त्याचा मित्र आर्यन संदीप वाघमारे हे दोघे सायकलीवरून किशोर सूर्यवंशी मार्गावरून जात होते. त्यावेळी कन्सारा चौकाकडून ओम्कार चौकाकडे एमएच 15 जीव्ही 7944 या क्रमांकाची सिटीलिंक बस भरधाव वेगात चालक घेऊन जात होता. 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने भरधाव वेगात विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये टाकली. त्याने सायकलीवरून जाणार्‍या संकेत आणि त्याच्या मित्राला जोरात ठोस मारल्याने संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात संकेतचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र आर्यन गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातानंतर सिटीलिंक बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी नागोजी सखाराम गवळी यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एस. एस. मद्रूपकर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group