रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ! टेम्पो दरीत कोसळून  तिघांचा मृत्यू
रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ! टेम्पो दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
img
Nandini khandare More
एका अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील किरोळी घाटात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात पहाटे पाच वाजताच्या सुमारास झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 

यवतमाळ येथील सहा भाविक माहूरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. परत जाताना केरोळी घाटात धोकादायक वळणावर त्यांचा टेम्पो दरीत कोसळला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आले.

क्रेनच्या सहाय्याने पोलिसांनी जखमींना दरीतून बाहेर काढले. जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टर तिघांवर उपचार करीत होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group