सोलापूर शहरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोलापुर शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत तिघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तिन्ही मुले त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
स्थानिकांनी त्या तिघांना अपघातानंतर रूग्णलायात दाखल केले, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी रूपाभवानी मंदिर परिसरात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा अधिक तपास पोलिसांकडून घेतला सुरु आहे.