सोलापूर शहरात एक संतापजनक घटना घडलीय. विवाहित महिलेला पतीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील लोकमान्य नगर परिसरात ही घटना घडली असून घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहे. फैजान जावेद शेख असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे, तर नर्गिस फैजान शेख असे विवाहित महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2024 साली नर्गिस आणि फैजान या दोघांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने दोघेही विभक्त राहत होते. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सतत्याने वाद होत होते. बुधवारी, ता 15 रात्री 10 च्या दरम्यान आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरी आला होता. त्याने पत्नीला आणि सासूला विश्वासात घेत मला नर्गिस सोबत बोलायचे असल्याने सांगून तिला एका खोलीत नेले. त्यानंतर सोबत आणेलेले पेट्रोल तिच्या अंगावर टाकून लाईटरने तिला पेटवून दिलं आणि तो फरार झाला.
घरात आग लागल्याचे पाहून शेजारी आणि कुटुंबियांनी नर्गिसचा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी पाहणी केली असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. माहितीनुसार, दोघांमध्ये तलाक देण्यावरून वाद सुरू होता, काल पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
नर्गिस व फैजान शेख या दोघांचा विवाह ७ सप्टेंबर २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर दोन ते तीन महिने त्यांचा संसार सुखाने चालला. त्यानंतर मात्र ते दोघे विभक्त राहत होते. तलाकवरून यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. बुधवारी रात्री ९:३० वाजता तो सासरी आला. पत्नीशी घरामध्ये बोलत असताना पुन्हा वाद झाला. यातून संतापलेल्या फैजानने सोबत आणलेल्या पेट्रोलची बाटली बाहेर काढली अन् तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत ती ओरडत बाहेर आली. दरम्यान फैजान शेख हा तिथून पळून गेला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.