भीषण अपघात ! नमाजला जाताना २१ जणांनी भरलेला पिकअप टेम्पो उलटला, एकाचा मृत्यू, २० जखमी
भीषण अपघात ! नमाजला जाताना २१ जणांनी भरलेला पिकअप टेम्पो उलटला, एकाचा मृत्यू, २० जखमी
img
वैष्णवी सांगळे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातुन मोठी बातमी समोर आली आहे. नमाज अदा करण्यासाठी जात असताना २१ जणांना घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अलिबाग तालुक्यातील बोरघर पुलाजवळ हा भीषण अपघात घडला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार नमाज अदा करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील रामराज येथे जात होते. यावेळी पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या वाहनात एकूण २१ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group