Nashik : ट्रक पलटी होऊन मोठी दुर्घटना ! विटांखाली दबून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू
Nashik : ट्रक पलटी होऊन मोठी दुर्घटना ! विटांखाली दबून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
नाशिकच्या चांदवड-मनमाड रोडवर  मोठी दुर्घटना घडली आहे. सिमेंटच्या विटा वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून हे तिघेही मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. 

माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला.  या अपघातात एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर जखमींवर उपचार सुरु आहे. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group