भीषण अपघात !  CRPF जवानांची बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू
भीषण अपघात ! CRPF जवानांची बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला आहे. सीआरपीएफच्या १८७ वी तुकडीची बस उधमपूरमधील कदवा या ठिकाणाहून वसंत गड या ठिकाणी निघाली होती. त्यामध्ये अनेक जवान होते. त्यावेळी अचानक मोठी दुर्घटना घडली अन् बस २०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला तर १५ पेक्षा जास्त जण जखमी आहेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनास्थळावर अद्याप बचावकार्य सुरू आहे.

हे ही वाचा ! 
PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राज्यात मोठ्या अभियानाला होणार सुरुवात, नवीन अभियान काय जाणून घ्या

सीआरपीएफच्या अपघातग्रस्त बसमध्ये १८ जवान होते. आज सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातामध्ये जखमी जवानांना उपचारासाठी विमानाने उधमपूर येथील लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group