एकलहरा रोडवर झालेल्या अपघातात अभियंता युवकाचा मृत्यू, एक जखमी
एकलहरा रोडवर झालेल्या अपघातात अभियंता युवकाचा मृत्यू, एक जखमी
img
Chandrakant Barve
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :  मुंबईहून मामाकडे शिक्षणासाठी आलेल्या तरुण अभियंता विद्यार्थ्याचा एकलहरा रोडवर भीषण अपघातात मृत्यू झाला. कॉलेजमधून परतत असताना भरधाव टाटा कंपनीच्या हायवा ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत आयुष विजय जाधव (वय 22, रा. डोंबिवली, मुंबई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला मामेभाऊ प्रद्युन्म श्रीकांत पगारे (वय 18) हा  जखमी झाला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी तो शिक्षणासाठी सिन्नर फाटा, भोरमळा येथील मामा संतोष दगेश पगारे व श्रीकांत दगेश पगारे यांच्याकडे राहण्यास आला होता.आज सकाळी साडेनऊच्या सुमारास आयुष व त्याचा मामेभाऊ प्रद्युन्म हे मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काही कागदपत्रे जमा करण्यासाठी एक्टिवा दुचाकी क्रमांक MH 15GB 1733वरून गेले होते.

कॉलेजचे काम आटोपून हे दोघे परतत असताना एकलहरा रोडवरील चेंबरी नं. १ जवळ धनवटे पेट्रोल पंपासमोर अचानक भरधाव टाटा कंपनी च्या हायवा ट्रक क्रमांक MH 15 HK 0789 ने त्यांच्या एक्टिवा दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आयुष डंपरखाली सापडला, तर प्रद्युन्म बाजूला फेकला गेला. आयुषच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, शिक्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या आयुषच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. टाटा कंपनी च्या हायवा ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार संदीप सानप करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group