भीषण !  धावत्या गाडीत चालकाला फिट आल्यानं अपघात, दहा वाहनांना चिरडलं
भीषण ! धावत्या गाडीत चालकाला फिट आल्यानं अपघात, दहा वाहनांना चिरडलं
img
नंदिनी मोरे
आजकाल अपघातांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. दरम्यान अनेक अपघात ट्राफिक, वाहनांमधील तांत्रिक बिघाड अशा कारणाने होत असतात. दरम्यान आता एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.  हा अपघात चालकाला  फिट आल्यानं झाला असलायचं समजतंय. चंद्रपूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. तुकुम -ताडोबा रस्त्यावर हा अपघात घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. अनियंत्रित झालेल्या हायवानं फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली, तसेच या अपघातामध्ये हायवानं दहा वाहनांना देखील चिरडलं आहे. या अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून, एक तरुणी जखमी झाली आहे, जखमी तरुणीला स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला अनियंत्रित झालेल्या हायवानं फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली, या अपघातामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारी लक्कडकोट येथील रहिवासी असलेल्या सानिका कुमरे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या हायवानं दहा वाहनांना देखील उडवलं आहे, या घटनेत या वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या अपघातानंतर पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतलं आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group